प्रीटी झिंटाने कॉंग्रेसच्या नेत्यांकडे झेप घेतली

फेक न्यूज पसरविणाऱ्यांना लाज वाटायला हवी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केरळ काँग्रेसने केलेल्या दाव्यावर अभिनेत्री प्रीति झिंटाने आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या बँक कर्जाशी निगडित आहे. फेक न्यूज फैलावल्याबद्दल काँग्रेस नेत्यांना लाज वाटायला हवी, असे प्रीतिने सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे. भाजपला लाभ पोहोचविल्यामुळे प्रीति झिंटाचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

प्रीति झिंटाने स्वत:चे सोशल मीडिया अकौंट भाजपच्या स्वाधीन केले असून याच्या बदल्यात स्वत:चे 18 कोटी रुपयांचे कर्ज माफ करवून घेतेल, बँक मागील आठवड्यात बुडली आणि रुपये जमा करणारे लोक रुपयांसाठी रस्त्यांवर आल्याचा दावा केरळ काँग्रेसकडून करण्यात आला होता. स्वत:चे सोशल मीडिया अकौंट्स मीच हाताळते. फेक न्यूजला प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस नेत्यांना शरम वाटली पाहिजे. कुणीच माझे कर्ज माफ केलेले नाही. एक राजकीय पक्ष किंवा त्याचा नाते फेक न्यूज फैलावत असल्याचे मला धक्काच बसल्याचे प्रीतिने म्हटले आहे.

बँकेकडून घेतलेले कर्ज मी पूर्णपणे फेडले आहे. हे कर्ज फेडून आता 10 वर्षे झाली आहेत. हे स्पष्टीकरण दिल्याने कुणाला कुठलाही गैरसमज होणार नाही अशी अपेक्षा असल्याचे म्हणत प्रीतिने काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले आहे. अलिकडेच आरबीआयने न्यूज इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतून पैसे काढण्यावर 6 महिन्यांसाठी बंदी घातली होती. तसेच बँकेवर नवे कर्ज वितरित करण्यापासून रोखले होते. परंतु आरबीआने या अटी शिथिल केल्या आहेत. याच्या अंतर्गत बँकेचे ठेवीदार 27 फेब्रुवारीपासून स्वत:च्या खात्यांमधून 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकणरा आहेत.

Comments are closed.