अमेरिकेत आता 'एआय' फोर्सची तयारी सुरू आहे.

ट्रम्प यांची मोठी घोषणा : पुढील औद्योगिक क्रांती ठरणार

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एआय फोर्स’ निर्माण करण्याची तयारी सुरू असून लवकरच एक ‘एआय सीजर’ नियुक्तीची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला ‘संपविणे किंवा नष्ट’ होऊ देण्यासाठी गुपचूप बसून राहणार नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिका या महत्त्वपूर्ण उद्योगाच्या विकासाला कुठल्याही प्रकारे रोखण्याचे काम करणार नाही. आम्ही कुठल्याही प्रकारे या अविश्वनसयी उद्योगाच्या विकासात अडथळे आणणार नाही तसेच या क्षेत्रावर दबाव टाकणार नाही. याऐवजी आम्ही एआय क्षेत्राला महत्त्व देऊ आणि याला मदत करू आणि याच्या विकासावर नजर ठेवू. परंतु आम्ही चुकीच्या कामांवरही नजर ठेवणार आहोत आणि वर्तमान फौजदारी आणि दिवाणी न्याय व्यवस्थेद्वारे असे सहजपणे करू शकतो असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.

यापूर्वी स्पेस फोर्सची स्थापना

ट्रम्प यांनी 2019 मध्ये अंतराळाच्या क्षेत्रातील अमेरिकेचे प्रभुत्व वाढविण्यासाठी स्पेस फोर्सची स्थापना केली होती. तर अलिकडेच अमेरिकेने अंतराळाच्या कक्षेत शस्त्रास्त्रs तैनात केल्याचे मान्य केले होते. या शस्त्रास्त्रांचा वापर शत्रूच्या कारवाईला सामोरे जाण्यासोबत आक्रमक अन् संरक्षणात्मक दोन्ही अभियानांमध्ये केला जाऊ शकतो.

एआय क्रांती

एआय पुढील औद्योगिक क्रांती किंवा इंटरनेटसारखे आहे. एआय अमेरिकेच्या जीडीपीत 25 टक्क्यांपर्यंत योगदान देऊ शकते. एआय नष्ट होण्याचा डेमोक्रेट्सकडून खोटा दावा केला जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.  परंतु ट्रम्प यांनी प्रस्तावित ‘एआय फोर्स’ची संरचना किंवा ‘एआय सीजर’च्या जबाबदाऱ्यांविषयी कुठलीच माहिती दिलेली नाही. अमेरिकेत एआयचा जलद विकास आणि याच्याशी निगडित संभाव्य जोखिमींवरून सुरु असलेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे.

अमेरिका अन् चीन यांच्यात चढाओढ

अमेरिका एआयच्या शर्यतीत चीनच्या मागे राहू शकत नाही असे म्हणत अमेरिकेचे अॅटर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून तंत्रज्ञान चोरणारे चिनी लोक आणि कंपन्यांच्या विरोधात कारवाईचे आश्वासन दिले होते.  एआय हे अत्यंत लाभदायक तंत्रज्ञान असून याला नियंत्रित करणे किंवा याचा वेग कमी करण्यासाठी न्याय विभागाशी निगडित मागण्या त्यांनी फेटाळला होता. न्याय विभाग एआयशी निगडित गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करेल, परंतु आम्ही तंत्रज्ञानाच्या नियामकाची भूमिका बजावणार नाही असे ब्लांश यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.