गगन्यान मिशनची तयारी तीव्र आहे
क्रू मॉड्यूलची पहिली एअर ड्रॉप चाचणी यशस्वी : ‘इस्रो-डीआरडीओ’च्या प्रयत्नांना सशस्त्र दलांचीही मदत
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गगनयान मोहिमेची तयारी तीव्र केली आहे. इस्रोने रविवारी गगनयान मोहिमेसाठी पॅराशूट-आधारित डिसेलेरेशन सिस्टमच्या संपूर्ण प्रात्यक्षिकासाठी पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी इस्रो, भारतीय हवाई दल, डीआरडीओ, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्यात आली.
गगनयान ही देशातील पहिली मानवी अंतराळ उ•ाण मोहीम आहे. या अंतर्गत चार अंतराळवीरांना अंतराळ प्रवासावर नेले जाईल. यावर्षी हे अंतराळयान प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. प्रथम एक मानवरहित चाचणी उ•ाण असेल, ज्यामध्ये एक व्योमित्र रोबोट पाठवला जाईल. गगनयान मोहीम तीन दिवसांची आहे. या मोहिमेसाठी मानवांना 400 किमीच्या पृथ्वी कक्षेत अवकाशात पाठवले जाईल आणि नंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणले जाईल.
चाचणी दरम्यान, विमानातून एक मॉक मॉड्यूल सोडण्यात आले आणि नवीन विकसित पॅराशूट असेंब्लीच्या मदतीने सुरक्षितपणे उतरवण्यात आल्यामुळे चाचणी यशस्वी झाली. या चाचणीचे नाव ‘आयएडीटी-01’ असे होते. इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते, आयएडीटी-01 चा उद्देश संपूर्ण पॅराशूट उघडण्याची प्रक्रिया योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासणे होते. यामध्ये त्याचे परिणाम, पॅराशूट उघडण्याची प्रक्रिया आणि नंतर मुख्य मोठे पॅराशूट उघडणे यांचा समावेश आहे. या चाचणीने पॅराशूट लँडिंगपूर्वी योग्यरित्या कार्यरत असल्याची पोचपावती दिली असून इस्रोला आपण क्रू फ्लाइटच्या जवळ पोहोचत असल्याची आशा निर्माण झाली आहे.
सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टमचे काम पूर्ण
इस्रोने यापूर्वी गगनयान मोहिमेसाठी सर्व्हिस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टमचे (एसएमपीएस) काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या चाचणीदरम्यान, प्रणोदन प्रणालीची कामगिरी अंदाजानुसार सामान्य होती. इस्रोच्या मते गगनयानच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये दोन प्रकारच्या इंधनावर चालण्याची एक विशेष प्रणाली स्थापित करण्यात आली होती. ही प्रणाली मानवांसह अंतराळात जाणाऱ्या भागाला मदत करते. त्याचे काम रॉकेटला योग्य कक्षेत नेणे, उ•ाणादरम्यान दिशा नियंत्रित करणे, गरज पडल्यास रॉकेटचा वेग कमी करणे आणि काही समस्या असल्यास, मिशन मध्यभागी थांबवणे आणि अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणणे अशी आहे.
गगनयानसह भविष्यातील योजना
इस्रोच्या आगामी योजनांचा आराखडा देखील समोर आला. वर्षअखेरीस गगनयान-1 मोहीम सुरू केली जाईल. ज्यामध्ये मानव-रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात प्रवास करेल. भारत 2027 मध्ये पहिले मानवयुक्त अंतराळ उ•ाण करेल. त्यानंतर 2028 मध्ये चांद्रयान-4, शुक्र मोहीम आणि 2035 पर्यंत ‘भारतीय अंतराळ स्थानक’ स्थापन केले जाईल. 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
…हे मोठे यश : डॉ. जितेंद्र सिंह
‘आयएडीटी-01’ चाचणी यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधानाची भावना व्यक्त करत सर्व टीमचे अभिनंदन केले. हे मोठे यश असल्याचे स्पष्ट करतानाच गगनयान मोहिमेसाठी एचएलव्हीएम-3 रॉकेट तयार आहे. हे रॉकेट मानवांना अंतराळात घेऊन जाईल, असे सिंह यांनी सांगितले. तसेच क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूलसाठी प्रोपल्शन सिस्टम बनवण्यात आले आहेत आणि त्यांची चाचणी देखील घेण्यात आली आहे. क्रू मॉड्यूलमध्ये अंतराळवीर राहतील. सर्व्हिस मॉड्यूल क्रू मॉड्यूलला ऊर्जा आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.