मी दाखवलेली हिंमत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने दाखवली नसती, मी जे केलेय, ते कोणीही करू शकत नाही; ट्रम्प यांचे फुत्कार
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता वाढत आहे. हे युद्ध 11 दिवस चालेल, याचा अंदाज इस्रायल आणि अमेरिकेला नव्हता. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण शरणागती पत्करेल आणि युद्ध संपेल, असे त्यांना वाटले होते. मात्र,इराणच्या इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याने हे दोन्ही देश बावचळले आहेत. अशावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फुत्कार सोडले आहेत. मी दाखवलेली हिंमत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने दाखवली नसती, मी जे केलेय, ते कोणीही करू शकत नाही, असे सांगत ट्रम्प यांनी स्वतःचीच बढाई केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वतःचीच बढाई मारली आहे. इराण हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की ,इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षांमध्ये असे करण्याचे धाडस नव्हते. मला असा राष्ट्राध्यक्ष नको आहे ज्याच्याकडे पाच किंवा दहा वर्षांत असे करण्याचे धाडस नसेल. ट्रम्प यांनी इराणचे नवे नेते मोजतबा खामेनी यांना धमकी दिली आहे की, त्यांच्याही खात्मा करण्यात येईल. ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याचा आणि मृत्यूचा इशारा दिला आहे. युद्धाच्या ११ व्या दिवशी, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की ते मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते बनल्याने नाराज आहेत. त्यामुळे त्यांना संपवण्याची योजना आखली जात असल्याचे सांगण्यात येते. ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की ते इराणशी थेट बोलू शकतात.
अमेरिकेच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देत इराणने इतर शेजारी देशांवर हल्ला न करणाऱ्या देशांवर हल्ला केला होता. ते म्हणाले, मला सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी एक गोष्ट म्हणजे इराणने अशा देशांवर हल्ला केला जे त्यांच्यावर हल्ला करत नव्हते. जेव्हा आम्ही त्यांच्यावर प्रथम हल्ला केला तेव्हा आम्ही त्यांची ५०% क्षेपणास्त्रे नष्ट केली. आणि जर आम्ही ते केले नसते तर ती खूप कठीण लढाई झाली असती. इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने हे करण्याचे धाडस केले नाही. मला असा राष्ट्राध्यक्ष नको आहे ज्याच्याकडे पाच वर्षांत किंवा दहा वर्षांतही असे धाडस नसेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणविरुद्धचे युद्ध अल्पकालीन असू शकते, परंतु त्यांनी वाढण्याची शक्यता उघड ठेवली. तथापि, ट्रम्प म्हणाले की जर इराणने जागतिक तेल पुरवठा खंडित केला तर युद्ध वाढू शकते. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलाचा प्रवाह थांबवण्यासाठी काहीही केले तर अमेरिका त्यांच्यावर आम्ही कधीही पाहिलेल्यापेक्षा वीस पट जास्त शक्तीने हल्ला करेल. त्यामुळे आगामी काळात हे युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.