अध्यक्ष पद्म पुरस्कार देतात

विशेष सोहळ्यात 71 पुरस्कार्थींचा गौरव : तेलुगू अभिनेता आणि राजकारणी नंदामुरी बालकृष्ण यांना पद्मभूषण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनातील विशेष सोहळ्यात पद्म पुरस्कार-2025 च्या विजेत्यांना गौरवित केले. तेलुगू अभिनेता आणि राजकारणी नंदामुरी बालकृष्ण यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर व्हायोलिन वादक लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी सोमवारी 71 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण 139 जणांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. आता उर्वरित 68 जणांना दुसऱ्या टप्प्यात सन्मानित केले जाईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य आणि उद्योगपती पवन कुमार गोएंका यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हायोलिन वादक लक्ष्मीनारायणन सुब्रमण्यम, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी प्रमुख ओसामु सुझुकी (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डी. नागेश्वर रे•ाr यांनाही पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. मल्याळम लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.

पीआर श्रीजेशला पद्मभूषण, अश्विनला पद्मश्री

माजी भारतीय हॉकीपटू पीआर श्रीजेश याला सोमवारी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी श्रीजेश आणि अश्विन यांना हा सन्मान मिळाला आहे.

Comments are closed.