राष्ट्रपतींनी हे विधेयक तामिळनाडू सरकारकडे परत पाठवले.

चेन्नई:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मद्रास विद्यापीठ (दुरुस्ती) विधेयक तामिळनाडू सरकारला परत पाठविले आहे. हे विधेयक एप्रिल 2022 मध्ये तामिळनाडू विधानसभेत संमत झाले होते. ज्याच्या अंतर्गत विद्यापीठात कुलगुरू नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांऐवजी राज्य सरकारकडे देण्याचा प्रस्ताव होता. राज्यपाल आर.एन. रवि यांनी युजीसीच्या नियमांचा दाखला देत या विधेयकाला सहमती दिली नव्हती आणि ते राष्ट्रपतींकडे पाठविले होते. राष्ट्रपतींनी विधेयकाला मंजुरीशिवाय परत पाठविले आहे. आता राज्य सरकारला या विधेयकावर पुनर्विचार करावा लागणार आहे.

Comments are closed.