शाहिद आफ्रिदीने धर्म बदलायला सांगितला, पाकिस्तानमध्ये मिळाला नाही सन्मान काय म्हणाला माजी खेळाडू?
पाकिस्तान संघासाठी खेळणारा शेवटचा हिंदू क्रिकेटर दानिश कनेरिया चर्चेमध्ये आहे. तो आताच अमेरिकामध्ये झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने पाकिस्तानमध्ये त्याच्यासोबत झालेल्या भेदभावाबद्दल सांगितले. त्याआधी त्याने पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्यावर आरोप केले. कनेरीया म्हणाला, आफ्रिदीने त्याला किती वेळा धर्म बदलण्यासाठी सांगितले. अनिल दलपत नंतर दानिश कनेरिया पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी क्रिकेट खेळणारा केवळ दुसरा हिंदू खेळाडू आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये झालेल्या कार्यक्रमात एएनआयशी बोलताना तो म्हणाला की, पाकिस्तानमध्ये त्याच्यासोबत भेदभाव करण्यात आला. त्याला बाकीच्या खेळाडूंप्रमाणे सन्मान देण्यात आला नाही आणि त्याचं करियर खराब करण्याचा प्रयत्न देखील केला गेला.
ही पहिली वेळ नाही जेव्हा दानिश कनेरिया त्याच्या पाकिस्तानमधील अपमानजनक वागणुकीबद्दल भाष्य करत होता, त्याने 2023 मध्ये सुद्धा एका मीडिया इंटरव्यू मध्ये सांगितले होते की, मी माझ्या करिअरमध्ये चांगलं प्रदर्शन करत होतो. त्यासोबतच काउंटिंग क्रिकेट सुद्धा खेळत होतो. इंजमाम उलहक मला साथ देत होते आणि ते एकटे कर्णधार होते जे मला साथ देत होते. त्यांच्यासोबत शोएब अख्तर यांनी सुद्धा मला साथ दिली होती.
दानिश कनेरिया शाहिद आफ्रिदीवर आरोप करताना म्हणाला की, शाहिद आफ्रिदी आणि अन्य पाकिस्तानी खेळाडूंनी मला खूप त्रास दिला. ते माझ्यासोबत बसून जेवण करत नव्हते. तसेच शाहिद आफ्रिदीने मला खूप वेळा धर्म बदलण्याचा सल्ला दिला. इंजमाम उलहक कधी धर्माबद्दल माझ्याशी बोलले नाहीत. दानिश कनेरिया याच्यावर 2012 मध्ये स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. त्याच्यानंतर त्याच्यावर क्रिकेट खेळण्यापासून आयुष्यभर बंदी घालण्यात आली.
Comments are closed.