शिक्षणाचे सक्षमीकरण; मुंबईतील 17 शिक्षकांना प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आयोजित स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे टीओटी प्रशिक्षण 2.0 उद्या शुक्रवारी सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुसगाव, लोणावळा येथे होत आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी मुंबई जिह्यातील महेशकुमार बोरसे, स्नेहा अजित चव्हाण, जयवंत कुलकर्णी, कावेरी मांढरे, हेमाली जोशी, कल्पेश डोंगरे, संदीप शिंदे, रूपा मनकोडी, प्राजक्ता राजपूत, स्वप्ना शिंदे, वृषाली देसाई, संतोष यादव, ज्योती वारघडे, गौरी शिंदे, काशीपुरी गोसावी, प्रथमेश वाघोसकर, सुजाता केळकर या 17 शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.
Comments are closed.