इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींचे 100 मिलियन फॉलोअर्स आहेत
इन्स्टाग्रामवर हा टप्पा गाठणारे पहिले नेते : डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व जागतिक नेत्यांना मागे टाकत एक नवा विक्रम केला आहे. पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. या प्लॅटफॉर्मवर ही कामगिरी प्राप्त करणारे ते जगातील पहिले नेते आणि राजकारणी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये इन्स्टाग्रामशी जोडले गेले होते. इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्रम्प हे 4.32 कोटी फॉलोअर्ससोबत याप्रकरणी दुसऱ्या स्थानावर आहेत.
जगातील 5 दिग्गज नेत्यांच्या एकूण फॉलोअर्सची संख्या मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येपेक्षा कमी आहे. ट्रम्प यांच्यानंतर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचा क्रमाक असून त्यांचे 1.5 कोटी फॉलोअर्स आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लूला हे 1.4 कोटी फॉलोअर्ससह यादीत चौथ्या स्थानावर आहेत. तर तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांचे 1.1 कोटी फॉलोअर्स आहेत. अर्जेंटीनाचे अध्यक्ष जेवियर माइली हे 60 लाख फॉलोअर्ससह यादीत सहाव्या स्थानी आहेत.
तर अन्य भारतीय नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या पाहिली तरीही पंतप्रधान मोदी हे खूपच आघाडीवर आहेत. याप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या स्थानावर आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.6 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांच्यानंतर राहुल गांधींचा क्रमांक लागतो, ज्यांचे सुमारे 1.2 कोटी फॉलोअर्स आहेत.
एक्सवर 2 वर्षांपूर्वी 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदींनी 2024 मध्येच 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा गाठला होता. तर सद्यकाळात एक्सवर मोदींचे 10.6 कोटी फॉलोअर्स आहेत.
Comments are closed.