पंतप्रधान मोदींनी व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली.

सामरिक भागीदारी दृढ करण्यावर भर : हैदराबाद हाऊस येथे घेतली भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भेट घेतली. त्यांच्या पहिल्या भारत द्रौयादरम्यान होणाऱ्या या भेटीत दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी, राष्ट्रपती भवनात तो लाम यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही उपस्थित होते. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

आपल्याच पहिल्याच भारत दौऱ्यावर असलेले व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांचे मंगळवारी भारतात आगमन झाले. त्यांनी सर्वप्रथम बोधगया येथील महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीत द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रपती मुर्मू यांनीदेखील त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही त्यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली. याप्रसंगी सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तो लाम 7 मे पर्यंत भारतात असतील. या काळात ते मुंबईतील एका व्यावसायिक मंचावर सहभागी होऊनआर्थिक संबंधांना चालना देण्यावर चर्चा करतील. द्विपक्षीय संबंधांना बळकटी देणे हा त्यांच्या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.

…………….

Comments are closed.