पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. ही भेट कशासाठी होती, या विषयी चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच काही परिवर्तन केले जाण्याची शक्यता आहे. एका केंद्रीय मंत्र्याने त्यागपत्र दिले आहे. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार स्वीकारले आहे. आणखी काही नवे मंत्री येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट केले जातील, अशी शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये उबाठा शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत आलेल्या सहा खासदारांपैकी एकाचा समावेश होऊ शकतो. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि नव्या पक्षात गेलेल्या 20 खासदारांपैकी काहींचा समावेश या विस्तारात केला जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे या भेटीसंबंधी एक-दोन दिवसांमध्ये स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका केव्हा होणार, हेही लवकरच स्पष्ट होईल.
Comments are closed.