मोदी यांचे इटलीत मेलोनी यांना मेलोडी वाटप
इटलीच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट दिली. याचा व्हिडीओ मेलोनी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.
पंतप्रधान मोदी यांनी खूप चांगली भेट आणली आहे. ‘मेलोडी’ हे खूप छान चॉकलेट त्यांनी भेट म्हणून दिले आहे, असे मेलोनी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसतात. त्यावेळी मोदी चॉकलेटचे पाकीट दाखवत मेलोडी म्हणतात आणि मोदी-मेलोनी दोघेही खळखळून हसतात. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्यांनी जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान हसत रील बनवतात आणि भाजपवाले टाळी वाजवतात. हे नेतृत्व नाही, नौटंकी आहे,’ अशी तोफ त्यांनी डागली.
Comments are closed.