मोदींच्या चीन दौऱ्यासाठी मशागत

चीन आणि हिंदुस्थानच्या सीमा आता शांत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध शांततेचे आणि सौहार्दाचे बनले आहेत, अशा शब्दांत हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोदींच्या महिनाअखेरीस होणाऱया नियोजित चीन दौऱयापूर्वी मशागत सुरू केली आहे. अमेरिकेने चीन आणि हिंदुस्थानवर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर आता चीनसोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. हिंदुस्थान दौऱयावर असलेले चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी आणि डोवाल यांची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी 31
ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस चीनच्या दौऱयावर जात आहेत. या बैठकीत सुरक्षा, व्यापाराच्या दृष्टीने विविध मुद्दय़ांवर द्वीपक्षीय चर्चा होणार आहे.
Comments are closed.