हायवेच्या धावपट्टीवर पंतप्रधानांचे विमान उतरणार
ईशान्य भारतातील महामार्गावर इमर्जन्सी एअरस्ट्रिप
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान 14 फेब्रुवारी रोजी आसामच्या मोरान येथे एका महामार्गावर नार्मण करण्यात आलेल्या इमर्जन्सी एअरस्ट्रिपवर उतरणार आहे. ईशान्य भारतात पंतप्रधानांचे विमान पारंपरिक विमानतळाऐवजी महामार्गावर उतरण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. हा एअरस्ट्रिप राष्ट्रीय महामार्गाच्या डिब्रूगढ-मोरान हिस्स्यावर निर्माण करण्यात आला आहे.
मोरान एअरस्ट्रिप एनएच-127 च्या 4.2 किमी लांब हिस्स्यामध्ये विकसित करण्यात आली आहे. ही भारताची पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी (ईएलएफ) आहे, जी सैन्य आणि नागरी विमाने दोन्हींकरता वापरली जाऊ शकते. ईएलएफचा अर्थ युद्ध किंवा आपत्कालीनस्थितीत विमान महामार्गावर उतरु शकते किंवा तेथून उ•ाण करू शकते असा होतो. यामुळे रस्त्याचा दुहेरी लाभ होतो, दैनंदिन वाहतुकीसोबत सैन्यगरजांसाठीही त्याचा वापर होऊ शकतो. ही एअरस्ट्रिप ईशान्येचे रणनीतिक महत्त्व वाढविते, कारण हे क्षेत्र चीनच्या सीमेला लागून आहे. सरकारने असे अनेक ईएलएफ पूर्ण देशात विकसित केले आहेत, परंतु मोरान येथील ईएलएफ ईशान्येतील पहिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे नियोजन
लँडिंग : पंतप्रधानांचे विमान थेट महामार्गावर उतरणार, ही ईशान्येतील पहिली अशी वेळ असेल.
डेमो : पंतप्रधानांच्या उपस्थितीत राफेल आणि सुखोई लढाऊ विमान एक स्पेशल एरियल डेमो करतील. यात विमान महामार्गावरून लँडिंग आणि टेकऑफ दाखवतील. डेमो सुमारे 30-40 मिनिटांचा असेल.
उद्देश : हा कार्यक्रम भारताची आपत्कालीन तयारी, ईशान्येचा विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेला दाखवेल. पंतप्रधानांचा दौरा पायाभूत सुविधांच्या दुहेरी वापरावर (नागरी-सैन्य) जोर देईल.
हा डेमो एअरस्ट्रिपच्या क्षमतेला प्रदर्शित करेल. राफेल हे फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेले आधुनिक लढाऊ विमान आहे, तर सुखोई रशियाकडून प्राप्त करण्यात आले आहे. दोन्ही लढाऊ विमाने भारतीय वायुदलाची मुख्य शस्त्रs आहेत.
ELF चे महत्त्व काय आहे?
-युद्धात जर विमानतळाचे नुकसान झाले तर महामार्ग पर्याय ठरू शकतात.
-पूर किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी मदतसामग्री पोहोचविण्यासाठी.
-ईशान्येसारख्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये यामुळे सुरक्षा वाढते.
सरकारने राजस्थान, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि अन्य ठिकाणी देखील ईएलएफ निर्माण केले आहेत. मोरान ईएलएफ ईशान्येला मजबूत करण्याचा हिस्सा असून तेथे पायाभूत विकासावर जोर आहे.
Comments are closed.