दोनदा Unsold, पण शेवटी नशिबाने घेतली कलाटणी! पृथ्वी शॉसाठी दिल्लीने उघडली दारं, लिलावानंतर पोस्
पृथ्वी शॉ आयपीएल 2026 लिलाव : देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आयपीएल 2026 मेगा ऑक्शनपूर्वीच आपली ताकद दाखवणाऱ्या पृथ्वी शॉसाठी अखेर आयपीएलचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. मागील वर्षी अनसोल्ड राहिल्यानंतर यंदाही दोन फेऱ्यांमध्ये त्याच्यावर कुणीही बोली लावली नव्हती. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. मात्र तिसऱ्या फेरीत अचानक दिल्लीने पृथ्वी शॉला संघात सामावून घेतले. गेल्या तीन वर्षांपासून पृथ्वीच्या कामगिरीचा ग्राफ घसरताना दिसत होता. पण आता स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याला एक ‘गोल्डन चान्स’ मिळाला आहे. लिलावात विकल्या गेल्यानंतर पृथ्वी शॉने इंस्टाग्रामला एक स्टोरी ठेवली. ज्यामध्ये इट इज ओके… असे लिहिले.
आयपीएल 2026 च्या लिलावात पृथ्वी शॉ 75 लाखांच्या बेस प्राइससह उतरला होता. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही. अखेरच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉसाठी पॅडल उचलत त्याला संघात घेतले. एकेकाळी दिल्लीसाठी महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पृथ्वीला आयपीएल 2025 पूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्याआधी तो 6 कोटी रुपयांत संघाचा भाग होता, मात्र सतत घसरत जाणारी कामगिरी त्याच्या अडचणी वाढवत होती.
2018 मध्ये दिल्लीकडूनच आयपीएल पदार्पण
पृथ्वी शॉच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2018 मध्ये झाली आणि तेव्हाही दिल्लीनेच त्याला 1.2 कोटी रुपयांत विकत घेतले होते. अपेक्षांवर खरा उतरत पृथ्वीने दुसऱ्याच आयपीएल सामन्यात 44 चेंडूंमध्ये 62 धावांची खेळी केली. त्या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट 153.12 इतका प्रभावी राहिला. 2021 हा हंगाम पृथ्वीच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरला. 15 डावांत त्याने 479 धावा करत चार अर्धशतकांची नोंद केली.
2022 मेगा ऑक्शनमध्ये पुन्हा दिल्लीच तारणहार
2021 मधील उत्कृष्ट कामगिरीचे फळ पृथ्वीला 2022 च्या मेगा लिलावात मिळाले. दिल्लीने त्याला तब्बल 7.5 कोटी रुपयांत संघात कायम ठेवले. त्या हंगामात सलग 6 चौकार मारल्याने तो चर्चेत राहिला. मात्र त्यानंतर त्याची कामगिरी घसरली. टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर फिटनेसच्या कारणांमुळे बीसीसीआयनेही त्याच्यावर कारवाई केली.
पृथ्वी शॉ 9:10 PM: राउंड 2 मध्ये देखील न विकल्या गेल्यानंतर एक दुःखद कथा अपलोड केली.
9:17 PM: राउंड 3 मध्ये DC ला ₹75L मध्ये विकले.
कथा हटवली. देवाची योजना. 🤩 pic.twitter.com/463IFPhuDX
— दिंडा अकादमी (@academy_dinda) १६ डिसेंबर २०२५
2025 मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र याच वर्षी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. रणजी ट्रॉफीत ऑक्टोबर महिन्यात त्याने धमाकेदार द्विशतक झळकावले. मागील 10 डावांत पृथ्वीच्या बॅटमधून 4 अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या आहेत. आता आयपीएल 2026 मध्ये मिळालेली ही संधी पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला नवी दिशा देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.