मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रव
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल रो मराठी बातम्या : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकृती अग्रवाल यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मार्च 2026 मध्ये दोघांनी साखरपुडा केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे जुलैमध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आकृती अग्रवालने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे या चर्चांना सुरुवात झाली. या स्टोरीत तिने कोणाचाही थेट उल्लेख न करता विश्वासघात आणि अफवांबाबत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अनेकांनी या पोस्टचा संबंध पृथ्वी शॉशी जोडत विविध तर्क लावण्यास सुरुवात केली.
आकृतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीने खळबळ
आकृतीने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “माझ्यासोबत अनेक वेळा विश्वासघात झाला, पण मी कधीच एक शब्दही बोलले नाही. एक पाऊल पुढे टाकल्यानंतरही आज हे सगळं घडेल, यावर अजूनही विश्वास बसत नाही.” यानंतर तिने आणखी एका स्टोरीमध्ये म्हटले, “सगळं खरं आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल जे काही पाहत आहात, त्या सर्व अफवा खऱ्या आहेत.” या दोन्ही स्टोरीमध्ये आकृतीने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी पृथ्वी शॉवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचा दावा केला. पण, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
पृथ्वी शॉचा फियास्को सुरूच आहे….
ज्या क्षणी मला वाटले की त्याच्या आयुष्यात सर्व काही स्थिर झाले आहे, हा B*mb टाकला गेला आहे, दोघेही एकत्र सुद्धा उघडपणे एकमेकांच्या विरोधात खणखणीतपणे पोस्ट करत नाहीत 🤷♂️🤷♂️🤦♂️ pic.twitter.com/Fpt6n275Xa
— Stubbsy³⁰ (@sinha7605) 5 जुलै 2026
सोशल मीडियावर अफवांचा पूर
स्टोरी व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध दावे समोर आले. काहींनी पृथ्वी शॉ आणि आकृती यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा केला. तर काहींनी आकृतीने साखरपुड्याचे फोटो हटवल्याचेही म्हटले. मात्र, या वृत्ताची पडताळणी केल्यानंतर हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्यापही पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल हे दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत. तसेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही दोघांच्या प्रोफाइलवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चा या केवळ सोशल मीडियावरील तर्क-वितर्क असल्याचे दिसून येते.
पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीवरही संकट
दुसरीकडे, पृथ्वी शॉची क्रिकेट कारकीर्दही सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. त्याने भारतीय संघासाठी अखेरचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. आयपीएलमध्येही त्याचे भविष्य अनिश्चित दिसत आहे. 2024 मध्ये तो शेवटचा दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरला होता. 2025 च्या आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्यानंतर 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवत संघात घेतले, मात्र संपूर्ण हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
🚨ब्रेकिंग: पृथ्वी शॉच्या मंगेतराचे म्हणणे आहे की पृथ्वी शाहने तिची फसवणूक केली
– पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी मार्च 2026 मध्ये एंगेजमेंट केली होती
– आक्रितीने पृथ्वी शॉला अनफॉलो केले आहे आणि त्यांचे सर्व एंगेजमेंट फोटो हटवले आहेत
– तिने असेही सांगितले की, “सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या सर्व अफवा खऱ्या आहेत.”
— इन्फिनो स्पोर्ट्स (@infinosports) 5 जुलै 2026
एकीकडे क्रिकेट कारकिर्दीतील अनिश्चितता आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू झालेल्या चर्चांमुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, आकृतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा संबंध नेमका कोणाशी आहे किंवा दोघांच्या नात्यात खरोखरच काही बिघाड झाला आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा –
Comments are closed.