बुची बाबू स्पर्धेत ऋतुराज आणि पृथ्वी खेळणार

भारतीय क्रिकेटपटू रुतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची चेन्नईत 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान होणाऱया बुची बाबू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 17 सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व अष्टपैलू फलंदाज अंकित बावणेकडे सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा पृथ्वी शॉसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची पहिलीच वेळ असेल. गेल्या हंगामात मुंबईकडून निराशाजनक खेळ, फिटनेस तसेच शिस्तभंगाच्या कारणावरून त्याला संघातून वगळण्यात आले होते.

महाराष्ट्र संघ ः अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवळे, मंदार भंडारी, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, विक्की ओस्तवाल, हितेश वाळुंज, प्रशांत सोलंकी, राजवर्धन हंगर्गेकर.

Comments are closed.