Buchi Babu Trophy 2025 – पृथ्वीचे महाराष्ट्राकडून दमदार पदार्पण! पहिल्याच लढतीत झळकावले खणखणीत शतक

मुंबई सोडून महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याने दमदार पदार्पण केले आहे. बुची बाबू स्पर्धेत पहिल्याच लढतीत पृथ्वी शॉ याने छत्तीसगड विरुद्ध खेळताना खणखणीत शतक झळकावले आहे. पृथ्वीने 122 चेंडूत 14 चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली.
Team जेव्हा टीम स्कोअर 166/6 🤯 असेल तेव्हा पृथ्वी शॉने 111 (140) धावा केल्या.
– बुची बाबू ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी स्वप्नातील पदार्पण. pic.twitter.com/gw9kphdei3
– जॉन्स. (@Criccrazyjhons) ऑगस्ट 19, 2025
पृथ्वी शॉ याच्यासाठी गेले काही वर्ष खास राहिलेले नाही. टीम इंडियामधून दत्तू मिळाल्यानंतर मुंबईच्या संघातही त्याला स्थान मिळाले नाही. एवढेच नाही तर आयपीएलमध्येही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यामुळे नैराश्य आलेल्या पृथ्वीने बदल म्हणून मुंबई सोडली आणि महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडला आणि महाराष्ट्राकडून पहिल्यांदाच खेळताना शतक ठोकले.
चेन्नई येथे बुची बाबू स्पर्धेत छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात असताना पृथ्वीने आपला अनुभव पणाला लावत शतक ठोकले. त्याने 140 चेंडूत 111 धावांची खेळी केली.
Comments are closed.