ठाकरेंचे वकील गप्प बसले अन् एका मिनिटात सुनावणी संपली; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट मुद्द्यावर बोट;


शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांकडून चुकीचा युक्तिवाद मांडला गेला, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले आहे. कोर्टाने “तुमचा युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकू, आता वेळ नाही” असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर फक्त एका मिनिटात सुनावणी संपली, असे त्यांनी नमूद केले.

प्रकृतीच्या कारणास्तव गेले तीन महिने पृथ्वीराज चव्हाण सार्वजनिक जीवनापासून दूर होते आणि त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भात (Shiv Sena Party Symbol Case) झालेल्या सुनावणीवर भाष्य केले.

Prithviraj Chavan on Shiv Sena Party Symbol Case: ठाकरे गटाचे वकील गप्प बसले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “चिन्हाच्या संदर्भातील युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकतो आता वेळ नाही. निवडणुका हे राजकीय पक्षाचे कामच आहे. त्यासाठी तयार असायला पाहिजे. त्यामुळे निवडणुका होत राहतील, असं कोर्ट म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाचे वकील गप्प बसले. प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो. एक केंद्रीय आणि दुसरी स्थानिक. गेली दहा वर्ष स्थानिक निवडणुकात झालेल्या नाहीत, हा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे होता. मात्र, तो मांडायला ठाकरेंचे वकील चुकल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Prithviraj Chavan on Shiv Sena Party Symbol Case: ही महत्त्वाची बाब त्यांनी कोर्टाला का नाही सांगितली?

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, भाजपने 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती पूर्णता मोडून काढली आहे. त्यामुळे लोकांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार राहिलेला नाही. हा वेगळा विषय आहे. त्याकरिता आम्हाला चिन्हाचा निर्णय स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी द्या, अशी बाजू ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडायला हवी होती. मात्र ती मांडली गेली नाही. ती आता मांडली गेली तरी देखील चालेल. दहा वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत. ही महत्त्वाची बाब त्यांनी कोर्टाला का नाही सांगितली? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Prithviraj Chavan on Karad Election: कराड नगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार

दरम्यान, कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करणे शक्य झाले नसल्याने कराडमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. तर, मलकापुरात मात्र, निवडणूक न लढविता समविचारी उमेदवारांना मदत करेल अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. कराडमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अमित जाधव यांनी नगराध्यक्ष आणि विविध प्रभागांत नगरसेवकपदासाठी 15 उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.