मेक्सिकोमध्ये इमरजेंसी लँडिंगदरम्यान खासगी विमान कोसळले; ७ जणांचा मृत्यू, ३ बेपत्ता

झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी अपघातग्रस्त झालेले खाजगी विमान अकापुल्कोहून टोलुका विमानतळावर उड्डाण करत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि आपत्कालीन लँडिंग दरम्यान हा अपघात झाला.
याबाबत माहिती देताना मेक्सिको राज्याच्या सिव्हिल प्रोटेक्शन समन्वयक एड्रियन हर्नांडेज यांनी सांगितले की, उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला. पायलटने जवळच्या फुटबॉल मैदानावर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विमान एका कारखान्याच्या लोखंडी छताला धडकले. धडकेनंतर कारखान्यात आग लागली, जी अग्निशमन दलाने विझवली. विमानात एकूण ८ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स असे १० जण होते. दुर्घटनास्थळी ७ मृतदेह सापडले असून, बचाव कार्य सुरू आहे. कारखान्यातील सुमारे १३० कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Comments are closed.