प्रियांका चोप्राने विजय थलपतीवर केला कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विजय थलपती या नावाची चर्चा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाल्यावर विजयवर त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. परंतु त्याचबरोबरीने मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांनीही त्याचे अभिनंदन आणि कोडकौतुक केले आहे. प्रियांका चोप्रा हिने विजय थलपतीबद्दल नुकतंच एक वक्तव्य केलेले आहे. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने तमिळ चित्रपटातील तिच्या अनुभवाविषयी सांगितले आहे. थमिझन या चित्रपटामध्ये प्रियांका आणि विजय या दोघांनी एकत्र काम केले होते.

विजय थलपती विषयी बोलताना प्रियांकाने या चित्रपटाच्या अनुभवाविषयी काही माहिती शेअर केली. प्रियांकाने विजयचे जोरदार कौतुक केले आणि म्हणाली, विजयला पाहण्यासाठी सेटवर फार गर्दी जमायची. तो डान्स करत असताना किंवा शूटींग करत असताना त्याची फक्त एक झलक दिसावी म्हणून ही गर्दी जमलेली असायची. ते सर्व बघून प्रियांकाला असं वाटायचं हा जणू काही देवच आहे. प्रियांकाला विजय हा त्यावेळी डेमी गाॅड वाटायचा.. म्हणजेच अर्धा मानव आणि अर्धा देवता. त्यामुळेच विजयसोबतचा पहिला असलेला हा चित्रपट प्रियांकासाठी खूप खास होता असे तिने या पाॅडकास्टच्या माध्यमातून सांगितले.

2002 मध्ये आलेल्या या चित्रपटामुळे प्रियांकाला विजयसारख्या एका सुपरस्टार सोबत काम करण्याची संधी मिळाली होती. प्रियांकाने सांगितले की, तिला तमिळ भाषा येत नसल्यामुळे तिने संवाद फोनेटिक पद्धतीने पाठ केले होते असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

Comments are closed.