‘सिकंदर’मुळे निर्मात्याला 91 कोटींचे नुकसान

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘सिकंदर’ चित्रपट ईदला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु या चित्रपटाला पायरेसीचा सर्वात जास्त फटका बसल्याने चित्रपट निर्मात्याला तब्बल 91 कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागले आहे, अशी माहिती अर्नस्ट अँड यंग या ऑडिट कंपनीच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन लीक झाले होते. त्यामुळे या चित्रपटाला सर्वात जास्त फटका बसला आहे. ‘सिकंदर’ने देशात 110 कोटी, तर जगभरात 184 कोटी रुपयांची कमाई केली होते. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना लीड रोलमध्ये दिसली होती.
Comments are closed.