वाझं मोहरामुळे हापूसचे उत्पादन घटणार; दरही वाढण्याची शक्यता. यंदा आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच

यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिल्याने आआहे केव्हा 30 टक्के आंबा उत्पादन होणार आहे बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला आहे. त्यामुळे मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्तात मिळणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे. आंब्याचे दरही यावर्षी महागणार आहे. मार्च महिना उजाडला तरी एक डझन आंब्याची किंमत 1300 ते 1500 प्रति डझन रुपयापर्यंत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवगड हापूस आंबा आता बाजारपेठेत दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन दोन ते तीन टक्के झाले आहे. सध्या तरी आंब्याचा एक डझन 1300 ते 1500 रुपये आहे पहिल्या टप्प्यातील जे उत्पादन आले त्यातील बरेचसे उत्पादन मुंबई वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आले. मात्र त्याचे प्रमाण खूप अल्प आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहर आल्यानंतरचा हा पहिल्या टप्प्यातील आंबा आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा आता 20 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत बाजारपेठेत दाखल होईल. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी 30% झाले आहे. हा दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठ्यांमध्ये जातो परदेशातही आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचा दर जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मोहर आला. मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन दोन ते तीन टक्केच झाले. जानेवारी महिन्यातही मोहर समाधानकारक आला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन 30 टक्के असल्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यातील दाखल होणारा आबाही फार कमी असेल व कॅनिंगसाठी आंबा उपलब्ध होणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध अंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली.

सातत्याने निसर्गात होणाऱ्या बदलाचा फटका देवगड हापूस आंब्याला बसला असून दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी 30 टक्केच झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये जातो. मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे यंदा आंबा डोळ्यातून अश्रू काढणारा असल्याची प्रतिक्रिया अंबाबागायतदार विनायक जोईल यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील जो मोहर येतो तो फेब्रुवारी महिन्यात येतो याच मोहराची फळे मे महिन्यात तयार होतात आणि तो स्थानिक बाजारात येतो. हाच आंबा कॅनिंगसाठी वापरला जातो. परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील आंबा मोहोर आलाच नसल्यामुळे परिणाम स्वरूप मे महिन्यात येणारा आंबा अल्प प्रमाणात असणार हे निश्चित असून फवारणीसाठी लागलेल्या औषधांचा खर्च देखील उत्पन्नातून मिळणार नसल्याची खंत प्रसिद्ध अंबाबागायतदार नंदा वाळके यांनी व्यक्त केली.

Comments are closed.