प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. राजाराम माने व त्यांच्या संशोधन टीमने औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असे ‘टॉक्सिक गॅस मॉनिटरिंग वेअरेबल डिव्हाइस’ विकसित केले असून या उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र (डिझाईन पेटंट) प्राप्त झाले आहे.

हे उपकरण औद्योगिक वसाहती, रासायनिक प्रयोगशाळा तसेच धोकादायक वातावरणात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी विकसित करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी विषारी वायूंची पातळी वाढल्यास हे उपकरण त्वरित इशारा (अलर्ट) देऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत करणार आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हे उपकरण ‘स्मार्ट सुरक्षा कवच’ ठरणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.

या संशोधन प्रकल्पात प्रा.डॉ. राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश गायकवाड, ऋषिकेश सूर्यवंशी, विजयपाल वाधवे, प्रतीक राऊत, तेजश्री साठे यांच्यासह डॉ. रुपेश मुद्देवाड, डॉ. रवी कवळे, डॉ. संतोष जाधव आणि डॉ. श्याम गोरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी संशोधन टीमचे अभिनंदन केले. तसेच अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचार्‍यांनी संशोधनाचे कौतुक करून संशोधक टीमला शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.