कोल्हापुरात गुरू-शिष्य नात्याला काळीमा; विद्यार्थीनींना केबिनमध्ये बोलावून अश्लील वर्तन, नराधम प्रा. सौरभ जोशीला बेड्या
कोल्हापूर शहरातील नामांकित केआयटी कॉलेजमधील प्राध्यापकाने केबिनमध्ये विद्यार्थिनींना बोलावून अश्लील वर्तन केल्याची गुरू शिष्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधम प्राध्यापक सौरभ जोशी याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तळात मोठी खळबळ उडाली असून, कॉलेज प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत नराधम जोशी याला तत्काळ निलंबित केले आहे.
प्रा. सौरभ जोशी हा वर्गातील काही विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक केबिनमध्ये बोलावून त्यांच्याशी अश्लील वर्तन करत होता. पीडित विद्यार्थिनींपैकी एकीने धाडसाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गोकळ शिरगाव पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रा. सौरभजोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून होत आहे.
नराधम सौरभ जोशी तत्काळ निलंबित
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, केआयटी कॉलेज प्रशासनाने प्रा. सौरभजोशी याला तत्काळ निलंबित केले आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी कॉलेजने स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. तसेच या घटनेचा खेद व्यक्त करत, पीडित विद्यार्थीनींना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस तपासात सहकार्य करण्याची ग्वाही संस्था चालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
तक्रार करण्याचे आवाहन
या व्यतिरिक्त आणखी कोणी विद्यार्थिनी वा प्राध्यापिका यांच्याबाबत प्रा. जोशीकडून अशा पद्धतीचे वर्तन केले गेले असेल त्यांनी कोणाच्याही दबावला बळी न पडता गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात बिनधास्त जाऊन तक्रार द्यावी. पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.