पाच दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली

जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिजबुल’वर कारवाई

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू-काश्मीर पोलिसांनी रामबन जिह्यातील गुल भागात बंदी घातलेल्या दहशतवादी गट हिजबुल मुजाहिद्दीनच्या पाच कार्यकर्त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. सांगलदान येथील सेराज दिन (48), दलवाह येथील रियाज अहमद (45), बंज भीमदास येथील फारूक अहमद (46) आणि मोईला येथील मोहम्मद अश्रफ (50) आणि मुश्ताक अहमद (47) हे पाच दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर भागात सक्रियपणे कार्यरत होते. ते दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. गुल भागातून हद्दपार केलेल्या या पाच दहशतवाद्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करणे हे दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या नेटवर्कचा नाश करण्यासाठी आणि या प्रदेशात दहशतवादाचे पुनरुत्थान रोखण्यासाठी एक निर्णायक पाऊल मानले जात आहे.

Comments are closed.