आता ब्रिटनमध्ये आंदोलन पेटले!स्थलांतरितांविरोधात लंडनमध्ये उठाव

श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता ब्रिटनमध्ये आंदोलन पेटले आहे. ब्रिटनमधील वाढत्या स्थलांतराला व स्थलांतरितांच्या सरकारी लांगूलचालनाला विरोध करत उजव्या कट्टरतावाद्यांनी उठाव केला आहे. ‘युनाइट द किंगडम’ म्हणत सुमारे दीड लाख नागरिक लंडनच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शहर ‘जॅम’ करून टाकले. निदर्शकांनी यावेळी केलेल्या हल्ल्यात 26 पोलीसही जखमी झाले.
उजवा कट्टरतावादी नेता टॉमी रॉबिनसन याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. स्थलांतरितांवर निर्बंध आणून ब्रिटनची ओळख जपायला हवी, अशी मागणी रॉबिनसन याने केली. ब्रिटन सरकारच्या स्थलांतरितांच्या संबंधांतील धोरणांनाही त्याने विरोध दर्शवला. मूळ ब्रिटिशांपेक्षा आता स्थलांतरितांना जास्त अधिकार मिळत आहेत, असा आरोपही त्याने केला.
एलन मस्क यांचाही पाठिंबा
प्रख्यात उद्योजक एलन मस्क यांनीही या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. लाखो आंदोलकांना त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित केले. ‘ब्रिटिश असणे ही कल्पनाच सुंदर आहे. मात्र आता ती ओळखच उद्ध्वस्त होत आहे. स्थलांतरितांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने ब्रिटन ओळख पुसली जाण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे, असे मस्क म्हणाले.
Comments are closed.