निफाड साखर कारखान्यासाठी प्रांत कार्यालयावर धडक

निफाड सहकारी साखर कारखान्याची विक्री थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निसाका संघर्ष समितीचा भव्य मोर्चा मंगळवारी निफाड तहसील व प्रांत कार्यालयावर धडकला. न्याय मिळेपर्यंत ही संघर्षाची वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विद्यमान आमदाराने रानवड कारखाना बंद पाडला, कोटय़वधींची देणी दिलेली नाहीत, अशी तोफ अनिल कदम यांनी डागली. शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील,प्रमोद गडाख, सचिन वाघ, बी. जी. पाटील, धोंडीराम रायते,अर्जुन बोराडे यांचीही भाषणे झाली.

कारखाना पुन्हा सुरू करा – संजय राऊत

थकित वेतनप्रश्नी कर्मचारी संघर्ष करीत असताना नाशिक जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीचा घाट घातला. केंद्रीय सहकार मंत्रालयाने कठोर पावले उचलून हा कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे पेंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली. हा सहकार तत्त्वावरील जुना कारखाना आर्थिक अनागोंदीमुळे बंद पडल्याचे लक्षात आणून दिले.

Comments are closed.