अमेरिकेत 'ट्रम्प अधिग्रहण' च्या विरोधात निषेध
मायदेशातच ट्रम्प अडचणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेला संघर्ष समाप्त करू पाहत आहेत, तर दुसरीकडे भारतासह अनेक देशांवर भरभक्कम आयातशुल्क लादत आहेत, परंतु याचदरम्यान अमेरिकेतच लोकशाही समर्थकांनी ट्रम्प यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. रिपब्लिकन पार्टीच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने केली जात आहेत.
अमेरिकेत कामगार संघटना आणि लोकशाही समर्थकांकडून शेकडो सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात ट्रम्प प्रशासनाकडून टेक्सासमध्ये रिपब्लिकनच्या बाजूने काँग्रेसचा नकाशा बदलण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शविण्यात आला. आमच्या प्रांतावर अध्यक्षांनी कब्जा करावा असे आम्ही निश्चितपणे इच्छित नाही. आमच्या प्रांताच्या प्रतिनिधींचा वापर करत जागांवर कब्जा करत निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु आम्हाला लोकशाही हवी आहे असे उद्गार ह्यूस्टन फेडरेशन टीचर्सचे अध्यक्ष जॅकी एंडरसन यांनी काढले आहेत.
व्हाइट हाउसमध्ये बसून धमकाविणारे आणि पूर्ण टेक्सासला विभागणाऱ्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांच्या विरोधात आम्हाला उभे रहावे लागेल असे इलिनोइसच्या शिकागोमध्ये निदर्शक जेम्स शॉएर्टेने म्हटले आहे. ओकलँड, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क शहरातही ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने झाली आहेत. परंतु कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम स्वत: रिपब्लिकन्सना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वत:च्या प्रांतात निवडणूक जिल्ह्यांच्या सीमा बदलण्याचा विचार करत आहेत.
रिपब्लिकन्सना होणार 5 जागांचा लाभ
फाइट द ट्रम्प टेकओव्हरच्या बॅनर अंतर्गत ही निदर्शने कमीतकमी 34 प्रांतांमध्ये होत आहेत, सर्वात मोठी निदर्शने ऑस्टिन, टेक्सासमध्ये होत आहेत. जेथे ट्रम्प यांनी दशकादरम्यान सुरू झालेल्या डिलिमिटेशन प्लॅनचे समर्थन केले, यामुळे रिपब्लिकन पार्टीला काँग्रेसमध्ये 5 अतिरिक्त जागा मिळू शकतात. चालू महिन्याच्या प्रारंभी टेक्सासच्या डेमोक्रेट्सनी रिपब्लिकनला कोरम पूर्ण करण्यापासून रोखत नकाशावर मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्प हे अमेरिकन नागरिकांना घाबरले आहेत. स्वत:च्या विचारांनी जिंकू शकत नाहीत याची जाणीव त्यांना आहे, याचमुळे ते कुठल्याही प्रकारे काँग्रेसवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत, अश्वेत समुदायांचा आवाज दडपून ते हे करत असल्याचा आरोप टेक्सास फॉर ऑल अलायन्सने केला आहे.
Comments are closed.