Provide immediate assistance to farmers affected by inclement weather demands congress state president harshawardhan sapkal in marathi
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. राज्य सरकारने तातडीने शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दकरावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
Congress : मुंबई : मे महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. राज्य सरकारने तातडीने शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दकरावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. (provide immediate assistance to farmers affected by inclement weather demands congress state president harshawardhan sapkal)
शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई देणारी एक रुपयातील पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारीत नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून पुन्हा 1 रुपयात पीक विमा योजना राबवावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
सपकाळ यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीवरून सरकारवर टीका केली. राज्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी- बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. दरवर्षीप्रमाणे खते बियाणे लिंकिंग करून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते, पण कारवाई काही करत नाही. त्यामुळे आतातरी सरकारने जागे व्हावे आणि लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे सपकाळ म्हणाले.
हेही वाचा – High Court : आई इतकीच मातृभूमी देखील महत्त्वाची… दहशतवादाचा आरोप असलेल्याचा जामीन अर्ज फेटाळला
भाजप युती सरकारचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी या सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असून हे असंवैधानिक आहे. दलित, आदिवासी, ओबीसी समाजासाठी असलेला निधी सरकारने वळवणे चुकीचे आहे. याबाबत राज्यपालांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. योजनांसाठी निधी नाही हे चित्र राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे द्योतक आहे. राज्य सरकारकडे निधी नसेल तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्राकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणून लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
21 मे रोजी काँग्रेसची तिरंगा यात्रा
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी आपल्या अभिमानास्पद कामगिरी केली. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा यात्रा काढणार आहे. महात्मा गांधी ते पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी, 21 मे रोजी काँग्रेस राज्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली.
Comments are closed.