17 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा राज्यभर मंत्र्यांना गावबंदी! मनोज जरांगे यांचा इशारा

आझाद मैदानाव आणि लाखोंच्या साक्षीने राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शब्द दिला आहे? त्याप्रमाणे 17 सप्टेंबरपासून सरकारने कुणबी प्रमाणपत्रे वाटावीत, नसता राज्यभर मंत्र्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरेंग पाटील यांनी दिला आहे? यासंदर्भात दसरा मेळाव्यात स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले? मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल सोमवारी आतील सराटीत मनोज जरेंग यांचा जंगी सत्कार करण्यात आला? यावेळी क्रेनने गुलाल उधळण्यात आला?

मुंबईतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आज प्रथमच आंतरवाली सराटी येथे आगमन झाले. गावाच्या वेशीवरच जरांगे यांचे गुलाल आणि फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी केलेले स्वागत पाहून जरांगे भारावून गेले. यावेळी बोलताना त्यांनी सलग दोन वर्षे चालू असलेल्या आरक्षणाच्या लढाईचा उल्लेख केला. मोठय़ा संघर्षाने आपण हे आरक्षण मिळवले आहे. आता दिलेला  शब्द पाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. हैदराबाद गॅझेटप्रमाणे 17 सप्टेंबरपासून सरकारने कुणबी प्रमाणपत्रे वाटण्यास सुरुवात करावी, यात काही गोलमाल केला तर मंत्र्यांना राज्यभर गावबंदी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने काढलेला अध्यादेश चुकीचा आहे असे काही जणांचे मत आहे. परंतु या अध्यादेशामुळे सगळय़ा मराठय़ांचा आरक्षणात समावेश झाला आहे. मराठय़ांनी विजय मिळवला आहे. जर अध्यादेशात काही चुका असतील तर तर सुधारित अध्यादेशही काढता येतो, असे सांगताना आरक्षणासाठी वारंवार लढावे लागले तरी लढणार, असे त्यांनी सांगितले.

तर आम्ही 1994 च्या अध्यादेशाला आव्हान देऊ!

राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. भुजबळांचा नामोल्लेख टाळून मनोज जरांगे यांनी, जर असा विचारही केला तर आम्ही 1994 च्या अध्यादेशाला आव्हान देऊ, असा इशारा दिला. मला कुणबी प्रवर्गातच आरक्षण पाहिजे, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.