पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यामुळे PSL 2026 धोक्यात; ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेतून माघार घेणार?

पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे आता ‘पाकिस्तान सुपर लीग’वर (PSL) संकटाचे सावट आले आहे. ही लीग सुरू झाली तरी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, आगामी सीझनमध्ये स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांसारखे दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी होणार आहेत.

PSL-11 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. यामध्ये टिम पेन आणि जेसन गिलेस्पी हे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकही सहभागी आहेत. ऑस्ट्रेलियन बोर्डाने खेळाडूंना पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली असली, तरी पेशावरला जाण्यास सक्त मनाई केली आहे. बोर्डाने पेशावरला ‘नो ट्रॅव्हल झोन’ घोषित केले आहे.

28 मार्च रोजी पेशावर जाल्मी आणि रावलपिंडी पिंडीज यांच्यात सामना होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडू (उदा. जेक फ्रेझर मॅकगर्क आणि आरोन हार्डी) सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, गरज पडल्यास खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी ‘प्रायव्हेट फ्लाईट’ची सोय करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी आणि सेदिकुल्लाह अटल यांसारख्या सर्व अफगाण खेळाडूंनी लिलावापूर्वीच या लीगमधून आपली नावे मागे घेतली आहेत.

Comments are closed.