खेळ गल्लीतील पोरांसारखा, पण पाकिस्तानची स्वप्नं आकाशाएवढी…; मोहसिन नक्वी म्हणाला, PSL आयपीएलल
मोहसिन नक्वी पीएसएल विरुद्ध आयपीएल : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी याने पाकिस्तान सुपर लीग (PSL) बद्दल मोठा दावा केला आहे. त्याच्या मते, पीएसएल झपाट्याने प्रगती करत असून भविष्यात ती आयपीएल (IPL) ला कडवी टक्कर देईल आणि जगातील सर्वात मोठी टी-20 लीग बनू शकते. मात्र हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा पीएसएलचा अकरावा हंगाम अफगाणिस्तानसोबतच्या तणावामुळे केवळ दोनच मैदानांवर खेळवला जात आहे. दुसरीकडे, आयपीएल कोणत्याही अडथळ्याशिवाय नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत पार पडत आहे.
पीएसएल नंबर वन होणार…; नक्वीला विश्वास
पीसीबीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स बैठकीत नक्वी याने सांगितले की, पीएसएलमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता रस ही तिच्या लोकप्रियतेची आणि झपाट्याने होणाऱ्या वाढीची साक्ष आहे. त्याच्या मते, पीएसएल आता गुंतवणुकीसाठी आकर्षक बाजारपेठ ठरत आहे. “लवकरच पीएसएल जगातील नंबर वन लीग बनेल,” असा विश्वास त्याने व्यक्त केला. 2026 हंगामासाठी फ्रँचायझी प्रक्रियेत झालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पाकिस्तानच्या क्रिकेट व्यवस्थेवरील वाढत्या विश्वासाचे द्योतक असल्याचेही त्याने नमूद केले.
वास्तव वेगळंच चित्र दाखवतं…
नक्वी याने भविष्यासाठी मोठी स्वप्नं रंगवली असली, तरी सध्याच्या स्थितीत पीएसएल आणि आयपीएल यांच्यात तुलना करणे कठीण आहे. पीएसएलमध्ये प्रामुख्याने तेच खेळाडू दिसतात, ज्यांना आयपीएलमध्ये संधी मिळत नाही. इतकेच नव्हे, तर काही खेळाडू पीएसएलचा करार सोडून आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य देतात. यावर्षी दासुन शनाका आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी असेच निर्णय घेतले. यामागचे मुख्य कारण म्हणजे आयपीएलमधील प्रचंड आर्थिक मोबदला.
आर्थिक आणि दर्जात्मक फरक प्रचंड
प्रसारण हक्क, फॅन एंगेजमेंट, खेळाचा दर्जा आणि उत्पादन गुणवत्ता या सर्व बाबतीत आयपीएल खूप पुढे आहे. आयपीएलचे मीडिया राइट्स सुमारे 6 अब्ज डॉलर्स इतके आहेत, तर पीएसएलचे केवळ 93 मिलियन डॉलर्सच्या आसपास. आयपीएलचे वार्षिक उत्पन्न 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, तर पीएसएलचे उत्पन्न साधारण 60 मिलियन डॉलर्सपर्यंत मर्यादित आहे.
जागतिक क्रमवारीत पीएसएल कुठे?
वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशनच्या अलीकडील रँकिंगनुसार, पीएसएल 48 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर आयपीएल 62.2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. द हंड्रेड (75.2) आणि SA20 (68) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.