पोर्तो रिकोची जेनिफर बॅरेटो ठरली ‘मिस युनिव्हर्स २०२६’ची विजेती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्य स्पर्धेचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. या स्पर्धेत पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने बाजी मारत ‘मिस युनिव्हर्स २०२६’चा किताब आपल्या नावावर केला आहे. मावळती मिस युनिव्हर्स मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने जेनिफरच्या डोक्यावर विजयाचा मुकुट चढवला.

या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ (Melissa Nunez) ही ‘फर्स्ट रनर-अप’, तर व्हेनेझुएलाची क्लारा वेगास गोएट्झ ही ‘सेकंड रनर-अप’ ठरली. अंतिम फेरीतील ‘टॉप ५’ स्पर्धकांमध्ये फिलिपिन्स, न्यूझीलंड, व्हेनेझुएला, डॉमिनिकन रिपब्लिक आणि पोर्तो रिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत या पाचही स्पर्धकांना “सध्याच्या काळात जगाला आपल्या नेत्यांकडून कशाची सर्वाधिक गरज आहे?” हा एकच प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे अत्यंत प्रभावी आणि समर्पक उत्तर देत जेनिफर बॅरेटो हिने परीक्षकांची मने जिंकली आणि प्रतिष्ठेच्या मुकुटावर आपले नाव कोरले.

Comments are closed.