निरोप न देता संपली पुजाराची कारकीर्द! बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित
वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान, हरभजन सिंह, गौतम गंभीर, अनिल कुंबळे आणि असे किती तरी दिग्गज खेळाडू. हे असे प्लेअर्स आहेत ज्यांनी टीम इंडियाच्या जर्सीतून जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. संपूर्ण करिअरभर टीमला विजय मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. पण, यानंतरही बीसीसीआयकडून त्यांना सन्मानाने निरोपसुद्धा मिळाला नाही.
या सगळ्या नावांचा उल्लेख पुन्हा एकदा होत आहे कारण चेतेश्वर पुजारासोबतही अगदी असंच काहीस घडलं आहे. राहुल द्रविड़नंतर टीम इंडियाची “दुसरी भिंत” म्हणून ओळखला जाणारा पुजारा यालाही फेअरवेल सामना मिळू शकला नाही. पुजाराला देखील जड अंतःकरणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करावी लागली.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन वेळा टेस्ट मालिका जिंकून देण्यात पुजाराचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर भारतात आणि परदेशी मैदानावरही पुजाराने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये देशासाठी अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या. मात्र जेव्हा त्याच्या बॅटने धावांची बरसात थांबवली, तेव्हा पुजाराला थेट टीमबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर अशा बातम्या समोर आल्या की, रहाणेसह पुजाराला देखील सिलेक्टरांनी हा संदेश देऊन टाकला आहे की आता ते त्यांच्यापुढे पाहत आहेत.
पण मोठा प्रश्न असा आहे की पुजारा सारख्या दिग्गज फलंदाजाला एक फेअरवेल सामना मिळायला नको होता का? देशासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मैदानावर शरीरावर असंख्य चेंडू झेलणाऱ्या पुजाराला सन्मानपूर्वक निरोप देणे योग्य नव्हते का? मात्र, भारतीय क्रिकेटमध्ये करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर दिग्गज खेळाडूंशी असाच व्यवहार होत आलेला आहे.
पुजारापूर्वीही असे अनेक भारतीय खेळाडू झाले आहेत, ज्यांना बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्मानाने निरोप देणं गरजेचं समजलं नाही. या यादीत वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, गौतम गंभीर, झहीर खान यांसारखी मोठी नावं आहेत, ज्यांनी भारताला 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकवून दिले होते. मात्र, यानंतरही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने या खेळाडूंना फेअरवेल सामना दिला नाही.
Comments are closed.