अपघातात बापाचं पोटापासून खाली काहीच शिल्लक राहिलं नाही; तरीही मुलींसाठी दोन हातावर जोर देऊन म्ह
बरामती अपघात करा: बारामतीमधील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या अपघातात (Pune Baramati Accident) तीन जणांचा मृत्यू झाला. 27 जुलै रोजी सदर अपघाताची घटना घडली. या अपघातात वडील आणि दोन बहिणीचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले.
सदर घटनेत चार वर्षाची मधुरा, ओंकार आचार्य व दहा वर्षांच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे तो वास्तव्यास होता. या घटनेने संपूर्ण बारामती हळहळली.
पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही-
अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही. तरीही त्यातूनही ओंकार आचार्य हे दोन हातांवर जोर देवून उठण्याचा प्रयत्न करून माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते. स्वतः जीवन मरणाच्या दारात असलेल्या बापाचे शब्द हृदय पिळवटणारे होते.
अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली-
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे झालेल्या दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या डंपरच्या भीषण अपघातात, दोन चिमुरड्या मुलींचा व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तजनांच्याप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे झालेल्या दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या डंपरच्या भीषण अपघातात, दोन चिमुरड्या मुलींचा व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तजनांच्याप्रती…
– अजित पवार (@ajitpawarspeaks) 27 जुलै, 2025
सुनेत्रा पवारांचंही ट्विट-
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे घडलेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप चिमुरड्या मुली आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले ही अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी घटना आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करते व अपघातात जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, असं खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या.
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे घडलेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप चिमुरड्या मुली आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले ही अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी घटना आहे.
मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करते व अपघातात जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.!– सुयुनेट्रा अजित पवार (@सुनात्रा_पावार) 27 जुलै, 2025
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.