Pune bpo company Shubhada Kodare murder case new update pune crime news my mahanagar live urk
पुणे – पुण्यातील विमाननगर येथील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने चाकूने वार करुन हत्या केली होती. या प्रकरणात पकडण्यात आलेला हल्लेखोर कृष्णा कनौजा याने मोठा खुलासा केला आहे. भररस्त्यावर कृष्णाने शुभदा कोदारे या तरुणीवर हल्ला केला होता. यात उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पकडण्यात आलेल्या कृष्णा कोदारे याचा दावा आहे, की शुभदा दिलेले पैस परत करत नव्हती. तिला चाकूचा धाक दाखवून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न होता. मात्र हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, असेही आरोपीने पोलीस कोठडीत सांगितले आहे.
काय आहे घटना ?
विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीला तिचा सहकारी कृष्णा कनौजीया या तरुणाने चाकूने भोसकून ठार केल्याची घटना 7 जानेवारी रोजी घडली होती. कृष्णा कनौजीया याने शुभदावर कंपनीच्या आवारातच चाकूने वार केले होते. यानंतर शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा कनौजीया याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून सुरु असलेल्या चौकशीत कृष्णा कनौजीया याने एक महत्त्वाचा खुलासा केला.
– Advertisement –
पैसे परत घेण्यासाठी धाक दाखवण्याचा प्रयत्न…
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा डब्ल्यूएनएस या कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत होती. आरोपी कृष्णाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलिस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, असे कृष्णा कनौजीया याने सांगितले. कृष्णा कनौजीया याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्यामधून या हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपशील समोर येत आहे.
शुभदा कोदारे हिने आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णाने शुभदाला तब्बल चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो शुभदाकडे सतत पैशांची मागणी करीत होता; पण शुभदा पैसे परत देत नव्हती. त्यामुळे कृष्णा आणि शुभदा यांच्यात कामाच्या ठिकाणी वादही झाला होता. शुभदा कोदारे हिने सहकारनगर पोलिस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.
– Advertisement –
Comments are closed.