Pune Bus Rape Case Datta Gade accused arrested in film style


स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीच्या तब्बल 70 तासांनंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीच्या तब्बल 70 तासांनंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दत्तात्रय गाडे असे या प्रकरणातील नराधमाचे नाव आहे. हा दत्ता गाडे घटनेपासूनच फरार झाला होता. घटनेच्या 48 तासांनंतरही तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. तर त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) मध्यरात्री 1.45 वाजताच्या सुमारास शिरूरमधील गुणाट गावातून अटक केली आहे. (Pune Bus Rape Case Datta Gade accused arrested in film style)

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता. घटनेच्या 48 तासांनंतरही दत्ता सापडत नसल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तो राहात असलेल्या घरी जाऊन पाहणी केली. पण घर बंद होते. पण त्यानंतर मात्र, तो त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या नातेवाईकाच्या घरासमोर असलेल्या ऊसाच्या शेतात तो लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्य हाती लागली आणि त्यानंतर दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी 100 पोलीस गुणाट गावात पोहोचले.

अशी झाली अटक…

गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी देखील पोलिसांना मोठी मदत केली. गुणाट गावातील ऊसाच्या शेतात दत्ता लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दिवसभर गुणाट गावातील सर्व शेत पोलिसांनी पिंजून काढले. दत्ता सापडत नसल्याने त्याच्या शोधासाठी डॉग स्कॉडसुद्धा मागवण्यात आले, मात्र तरीही तो सापडला नाही.

हेही वाचा… Sanjay Raut : ते ठाणे, हे पुणे… कायदे सगळीकडे वेगवेगळे; गंभीर गुन्ह्यातील आरोपींबाबत राऊतांचे मोठे विधान

मात्र, रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच अर्धा तासाच्या आत त्याला घेरले. पण यावेळी दत्ता गाडेने मागे ठेवलेला एक पुरावा पोलिसांच्या कामी आला. कारण दत्ता दोन दिवस ज्या शेतात लपून बसला होता, त्या ठिकाणी त्याचे कपडे पोलिसांना सापडले होते. त्यामुळे तो याच शिवारात असल्याचे निश्चित झाले होते. त्याचसोबत ज्या नातेवाईकाच्या घरी तो पाणी मागण्यासाठी गेला होता. त्यावरून तो इथेच लपून असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्रीच पुन्हा त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तू सरेंडर कर – पुणे पोलीस

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुन्हा दत्ता गाडेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तासभर होऊन तो सापडत नसल्याने पोलिसांनी पुन्हा डॉग स्कॉड मागवले. यानंतर पोलिसांनी कुत्र्याला त्याच्या शर्टाचा वास दिला आणि त्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. यावेळी तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपला असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी ग्रामस्थांकडून तो दत्ताच आहेच की अन्य कोणी याबाबत खात्री करून घेतली. पण तो दत्ताच असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी माइकवरून दत्ताला सरेंडर करण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या सततच्या उद्घोषनेनंतर दत्ता त्या बेबी टनलमधून बाहेर आला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला.



Source link

Comments are closed.