‘इन्फ्रा मॅन’ देवाभाऊंकडे दाखवायला एक चांगला रस्ता तरी आहे का? पुणेकरांचा संतप्त सवाल
2014 पासून पुणेकरांनी भाजपला आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून दिले. तरी पुणेकरांना एका चांगला रस्ता मिळाला नाही अशी तक्रार पुणेकरांनी केली आहे. तसेच ‘इन्फ्रा मॅन’ देवाभाऊंकडे दाखवायला एक चांगला रस्ता तरी आहे का? असा संतप्त सवाल पुणेकरांनी विचारला आहे.
कॉम्प्युटर इंजिनीअर असलेले अभिषेक सोमवंशी यांनी एक्सवर पोस्ट लिहीली आहे. सोमवंशी म्हणाले की, पुणेकरांनी 2014 पासून भाजपला भरभरून मतं दिली. आधी 8 आमदार आणि खासदार, नंतर 2017 मध्ये पालिकेत तब्बल 100 नगरसेवकांसह पूर्ण बहुमत. आज आपण 2025 मध्ये आहोत. तेव्हापासून गल्ली ते दिल्ली भाजप आहे पुणेकरांसाठी.
या सगळ्यानंतर पुण्यातला एक तरी असा रस्ता दाखवा जो केबल्स, पाईपलाईन्ससाठी खोदला गेला, पुन्हा व्यवस्थित डांबरीकरण झाले, लेन मार्किंग झाले, फुटपाथ झाला, त्यानंतर खड्डे पडले नाहीत आणि अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.
एक रस्ता? ‘इन्फ्रा मॅन’ असल्याचा दावा करणाऱ्या देवाभाऊंकडे दाखवायला एक रस्ता तरी आहे का? जर ही मूलभूत गोष्टसुद्धा देऊ शकत नसाल, तर आपण नक्की स्थानिक निवडणुकांत का मत देतोय?
विमानतळ, मेट्रो, रिंगरोड, एक्सप्रेस-वे हे कित्येक वर्षे चालणारे प्रोजेक्ट सोडा..
शहरातले रस्ते नीट करण्यात एवढं कठीण नक्की काय आहे? असा संतप्त सवाल सोमवंशी यांनी उपस्थित केला आहे.
पुणेकरांनी २०१४ पासून भाजपला भरभरून मतं दिली. आधी ८ आमदार आणि खासदार, नंतर २०१७ मध्ये पालिकेत तब्बल १०० नगरसेवकांसह पूर्ण बहुमत.
आज आपण २०२५ मध्ये आहोत. तेव्हापासून गल्ली ते दिल्ली भाजप आहे पुणेकरांसाठी.या सगळ्यानंतर पुण्यातला एक तरी असा रस्ता दाखवा जो केबल्स, पाईपलाईन्ससाठी…
– अबीशक सोडुशी (@एबेसन्केट) 13 सप्टेंबर, 2025
Comments are closed.