पुणे बर्स केस – दत्तरिया कार्ट

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी दत्ता गाडे हा गुन्हा केल्यानंतर तब्बल 70 तास फरार होता. त्याला पोलिसांनी त्याला शिरुरमधून अटक केलं. यातच आज त्याला न्यायालयात हजार करण्यात आलं. दत्ता गाडेवर 6 गुन्हे दाखल आहे. ज्यात 5 गुन्ह्यात तक्रारदार या महिला आहेत. आरोपीची चौकशीसाठी पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी 13 पथके तैनात केली होती. एवढेच नाही तर त्याला पकडणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. हे बक्षीस ज्या गावकऱ्याच्या माहितीवरून आरोपीला पकडण्यात आले, त्याला देण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Comments are closed.