Pune Crime : पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन, पतील, सासूला अटक
पुणे: पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीप्ती मगर-चौधरी असे आत्महत्या (Pune Crime News) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. २५ जानेवारीच्या रात्री गळफास (Pune Crime News) घेऊन तीने आत्महत्या केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विवाहिची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर फक्त एक महिना ठिक होता, त्यानंतर तिचा छळ सुरू झाला.(Pune Crime News)
आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
दीप्तीची आई हेमलता मगर वय 50 वर्षे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, माझी मुलगी नामे दिप्ती हिचा दि.23/11/2019 रोजी रितीरिवाजाप्रमाणे रोहन कारभारी चौधरी यांच्यासोबत वृंदावन गार्डन थेउर येथे लग्न झाले. त्यानंतर माझी मुलगी दिप्ती रोहन चौधरी ही तिच्या सासरी नांदण्यासाठी गेली. त्यानंतर सुरवातीचे एक महिना तिचा संसार व्यवस्थित चालला होता. त्यानंतर दि. 25/12/2019 रोजी तिचा पती रोहन चौधरी याने तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. तसेच तिचे पती व सासु सासरे, दीर हे तिला तु दिसण्यास आमच्या देखाण्या रूपास साजेशी अशी नाही व तुला घरातील स्वयंपाक सुध्दा येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला घर सुध्दा निटनेटके ठेवता येत नाही, तसेच तु आमच्या शेतात काम करणाऱ्या बायका तरी बऱ्या अशी तु घरात राहते, असं म्हणून तिचा शाररिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. (Pune Crime News)
Comments are closed.