पुणे हादरलं! आईच्या अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून घराबाहेर पडला, संतापाच्या भरात एकाला संपवलं

गुन्हे ठेवा: पुण्यात वारंवार समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत.  अशातच दौंड तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून  तरुणाने एका व्यक्तीला रात्रीतून संपवल्याची घटना घडलीय. गुरुवारी (14 ऑगस्ट) रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी भाजी विक्रेत्याने पोलीस ठाण्यात केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दौंड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नेमकं घडलं काय?

पुण्यातील दौंड तालुक्यातील इंदिरानगर परिसरात थरारक घटना घडली. कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाने एका व्यक्तीला रात्रीतून संपवल्याचा समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11:45 वाजता इंदिरानगर मधील जब्बार शेख यांच्या घरासमोर प्रवीण दत्तात्रय पवार या व्यक्तीवर जीव घेणं हल्ला करण्यात आला. आरोपी विशाल उर्फ नळ्या किसन थोरात याने आपल्या आईचे प्रवीण पवार याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून संताप्पाच्या भरात त्याच्यावर कोयताणे वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर तसेच तोंडावर व हातावर गंभीर जखमा होत्या.

दरम्यान या घटनेची तक्रार नितीन अशोक गुप्ते या भाजीविक्रेत्याने दौंड पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 103 नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे

नवऱ्याच्या धमकीनंतर स्नेहाने आयुष्य संपवलं

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी स्नेहा हिने आत्महत्या (Pune Crime News) केली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. याबाबत माहिती देताना स्नेहाचे वडील कैलास सावंत म्हणाले की, आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ कंपनीत गेले होते, त्यावेळी त्यांना हाकलून देण्यात आले, असे स्नेहाच्या वडिलांनी सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.