Pune Crime NCP leader daughter in law end her life dowry harassment alleged case registered


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी 23 वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे यांच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने वैष्णवी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. (Pune Crime NCP leader daughter in law end her life dowry harassment alleged case registered)

हेही वाचा : CJI Bhushan Gavai : मुख्य सचिव पोलीस महासंचालक कार्यक्रमाला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; पुढे काय झाले 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी यांनी घरातील बेडरुमचा दरवाजा बंद केला आणि गळफास घेत आत्महत्या केली. दरवाजा न उघडल्याने वैष्णवी यांच्या पतीने दरवाजा तोडला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा केली. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैष्णवी यांचे वडील आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी शनिवारी (17 मे) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती, सासू, नणंद यांना अटक केली.

वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद आहे की, वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण आणि जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने चर्चांना उधान आले आहे.



Source link

Comments are closed.