मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलं; उपाशीही ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, बीडच्या लेकीचा पुण्या
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">बीड : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलांच्या छळाची प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर आता अनेक प्रकरणे समोर येत आहेत, तर विवाहित महिला सासरच्या त्रासाला, जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. यामध्ये बीडच्या लेकीचा पुण्यात छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून तिल घराबाहेर काढलं. त्यानंतर तिची समजूत काढून तिला तिच्या माहेरच्यांनी नांदायला पाठवलं. यादरम्यान विवाहिता गर्भवती राहिली. तिने एका मुलीला जन्मही दिला. त्यानंतर, "तुला मुलगी कशी जन्मली, आम्हाला मुलगा हवा होता," असं म्हणत सासरच्या लोकांनी छळ सुरू केला.
चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू झाला
त्या चिमुकल्या मुलीसह सुनेला घराबाहेर काढलं. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. छळ झालेल्या विवाहितेचं लग्न 1 जून 2021 रोजी झालं होतं. सर्व मानपान आणि संसार उपयोगी साहित्य तिच्या घरून तिला देण्यात आलं होतं. विवाहानंतर सहा महिने सुनीताला सुखानं नांदवलं. पण, त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू झाला. काही दिवस सहन केलं, पण त्यानंतर तिने या त्रासाबद्दल 4 फेब्रुवारी 2022 रोजी आई-वडील व भावाला सांगितलं. घरातील सर्वजण पुण्याला आले आणि आपल्या लेकीला परत बीडला घेऊन गेले. काही दिवसांनी माहेरच्या लोकांना पुण्यात बोलावून घेतलं. झालेल्या सर्व गोष्टी मिटविण्यासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर गोष्टी थोड्या ठीक झाल्या, 13 मार्च 2023 रोजी तिला पुन्हा सासरी नेऊन सोडलं.
मुलगा हवा होता, म्हणून त्रास दिला
पुन्हा चार महिने ठिक गेले. याच दरम्यान सुनीता गर्भवती राहिली. तरीही तिला शारीरिक व मानसिक त्रास देणं कमी झालं नाही. परंतु, गर्भवती असल्याने तिने हे सर्व सहन केलं. त्यानंतर 25 जानेवारी 2024 रोजी सुनीताची प्रसूती झाली आणि तिने मुलीला जन्म दिला. सासरचे यामुळे आणखी नाराज झाले. मुलगा हवा होता, म्हणून त्रास दिला. तिला उपाशी ठेवलं. 23 मे 2025 रोजी तिला घराबाहेर काढल्यामुळे ती माहेरी आली. त्यानंतर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. तुला मुलगी झाली आहे, आता या मुलीचा पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च कोण करणार, असा प्रश्नही तिला सासरकडून विचारला जात होता. तिच्यासोबत तिच्या चिमुकल्या मुलीचाही छळ केला जात होता.
Comments are closed.