भाजप शहराध्यक्षांकडून पालिका, धर्मादाय आयुक्तांची फसवणूक; काँग्रेसचे सागर धाडवे यांचा आरोप

पुणे महापालिकेच्या अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेचा अवघ्या काही हजार रुपयांत करार करून माजी नगरसेवक, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना ताबा देण्याचा प्रकार समोर आला आहे. कोणतेही दस्तऐवजी सत्यापन न करता करण्यात आलेला हा करार संपूर्णपणे संशयास्पद आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गणेश मंडळाचा आधार घेत घाटे यांनी महापालिका मालकीच्या मालमत्तेवर बेकायदेशीर पद्धतीने करार करत महापालिका आणि धर्मादाय आयुक्तालयाची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे सागर धाडवे यांनी केला आहे.
महापालिकेच्या मालकीची भानुदास गेजगे व्यायामशाळा आणि परिसरातील माजी नगरसेवक धीरज घाटे यांचे कार्यालय या जागेवर बेकायदेशीर व अपारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या करारनाम्याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सागर धाडवे यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. तसेच, करारनाम्याची तत्काळ चौकशी करून त्याची कायदेशीर वैधता तपासून तो रद्द करावी. तसेच संबंधित अधिकारी व व्यक्तींवर कारवाई करण्याची तसेच सानेगुरुजी मंडळाच्या धर्मादाय नोंदी, आर्थिक व्यवहार आणि पात्रतेची स्वतंत्र चौकशी करण्याची सागर धाडवे यांनी महापालिकेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
Comments are closed.