कधी घरात, कधी फोटो स्टुडिओत, अल्पवयीन बहिणीवर भावाचा अत्याचार, पीडिता गर्भवती अन्… पुण्यातील

दौंड: दौंड तालुक्यात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी (Dound Crime News) संतापजनक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Dound Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. लैंगिक संबंधातून ही पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी (Dound Crime News) दौंड तालुक्यातील रहिवासी असून तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आरोपींनी अनेक वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. यातील आरोपी पैकी एकाचा दौंड तालुक्यात एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या (Dound Crime News)घरी आरोपींनी वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. 2024 मध्ये मार्च ते जून दरम्यान हा अत्याचार झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

आरोपी भाऊ वर्षभर पीडिते बहिणीचं लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार लपवण्यासाठी भावाने बहिणीवर वारंवार दबाव टाकल्याची संतापजन माहिती आहे. मात्र या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पिडीतेच्या घरी त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही दौंड तालुक्यातील गिरीम येथील रहिवासी आहे. या नराधम आरोपींनी तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी वारंवार अत्याचार केला आहे. धायरी येथे राहणारा आरोपी हा पीडित तरुणीचा नात्याने चुलत भाऊ आहे. शिवाय पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत अतसाता देखील आरोपींनी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम या परिसरात वायरलेस फाटा येथे फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये आणि पीडितेच्या घरी देखील आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे. मार्च 2024 ते जून 2024 या दरम्यान अत्याचार सुरू होता.

त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर पीडितेला आणि तिच्या बहीणीला जीवे मारण्याची धमकी या नराधमांनी दिली होती, असं फिर्यादीत सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधमांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपींना बारामती येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयाने नराधमांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने नागिरकांनी संताप व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.