Pune Crime News: रात्रीचे वेळी मोबाईल हिसकावणारा सराईत जाळ्यात, 4 मोबाईल जप्त, डेक्कन पोलीसांची कामगिरी
शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरासह बाणेर येरवडा परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. यापूर्वी त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. हबीब अबालु इराणी ( वय 24, रा. पाटील ईस्टेट, मूळ रा. रशिद कंपाऊंड मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे
मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडील मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला होता. त्याअनुषंगाने डेक्कन ठाण्याचे तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक महेश भोसले आरोपीचा माग काढत होते. सीसीटीव्हीसह माहितीवरुन आरोपी फिरत असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेऊन हबीब इराणी याला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, निलेश सोनवणे, नागनाथ म्हस्के यांनी केली.
Comments are closed.