डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने केले वार, येरवडा कारागृहात आरोपींमध्ये हाणामारी, एका आरोपीचा मृत्यू

गुन्ह्याच्या बातम्या ठेवा: पुण्यातील येरवडा कारागृहातच (Yerwada jail) हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने केले वार

विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले

आणखी वाचा

Comments are closed.