‘पुण्यात एकटी राहतेस, किती पोरांसोबत झो#$%, मस्त मजा करतेस’; कोथरुड पोलीस तरुणीला काय म्हणाले?
Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित समाजाच्या तरुणींचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यातील वरच्या खोलीत आपला तब्बल चार तास छळ सुरु होता, असा आरोप या तरुणींनी केला. यावेळी पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक शेरेबाजी केल्याचे या तरुणींनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये पीडित तरुणींनी पीएसआय कामठे, कॉन्स्टेबल शिंदे, सायबर पोलीस सानप, पिवळ्या रंगाचं चेक्सचं शर्ट घातलेले एक पोलीस यांचा उल्लेख केला आहे. या सर्वांनी पोलीस ठाण्यात आपला छळ केल्याचा आरोप तरुणींनी केला.
हे सर्व पोलीस कर्मचारी आणि निवृत्त पोलीस अधिकारी असलेले माझ्या मैत्रिणीचे सासरे कोथरुडमध्ये आमच्या फ्लॅटवर आले. त्यावेळी फ्लॅटमध्ये आम्ही दोघी मैत्रिणी होतो. त्यांनी घरात शिरताच झाडाझडती सुरु केली. त्यांनी आम्हाला दुपारी साडेतीन वाजता कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. तिकडे आम्हाला 7.30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावर बसवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी आम्हाला आमच्या विवाहीत मैत्रिणीचा पत्ता विचारुन मारायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही काही सांगितलं नाही. पण जास्त मार बसल्यावर पोलिसांना आम्ही तिचा पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक शेरेबाजी केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
आमची चौकशी करणाऱ्या कॉन्स्टेबल शिंदे नावाच्या मॅडमनी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत शेरेबाजी केली. एकट्या राहता, मोकाट सुटलाय. किती पोरांसोबत झोपते? तुझ्या रुमवर पोरं झोपायला येतात का? तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी/स्टोल एकाच रंगाचा आहे. तुम्ही लेस्बियन दिसताय. तुम्हाला पाहूनच वाटतं की, तुम्ही एलबीजीटीक्यू कम्युनिटीच्या आहात, असे वारंवार बोलून सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी माझा शाब्दिक लैंगिक छळ केल्याचे तरुणींनी सांगिते.
तुझा बाप नाही, फक्त माय आहे. सोडून दिलंय का तुला? पगारातले पैसे घरी देतेस का? त्यांनी पण तुला वाऱ्यावरच सोडलं आहे का? म्हणूनच तू वाया गेलीस. कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझ्या मोबाईलमधील फोटो पाहून, ‘मस्त मजा करते, ऐष करते’, अशी टिप्पणी केली. पोलीस वारंवार माझी जात विचारत होते, नाव सांगितलं की हसायचे. एकाने शिवी दिली की इतरजण हसायचे. पोलिसांनी माझ्या मोबाईलमधील पर्सनल चॅटही वाचले. माझ्या व्हॉईसनोट ऐकल्या. दोन मित्रांसोबतचे चॅट वाचून, ‘या दोघांमधला तुझा बॉयफ्रेंड कोण?’ असेही पोलिसांनी विचारले. कोथरुड पोलीस ठाण्यात जवळपास चार तास माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला असा आरोप पीडित तरुणीने केला.
Pune crime: पीएसआय कामठेने माझ्या शरीराला विकृतपणे स्पर्श केला; तरुणीचा आरोप
या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस ठाण्यातील पुरुष पोलीस सतत माझं शरीर न्याहाळत होते. जणू डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन करत होते. लेडीज कॉन्स्टेबलही सतत निरीक्षण करत होत्या. काहीतरी प्रश्न विचारत असताना पीएसआय कामठे माझ्या अंगावर आले. त्यांच्या हातांचा, खांद्याचा, हनुवटीचा घाणेरडा आणि विकृत स्पर्श मला झाला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. मला साध्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. तरीही कॉन्स्टेबल शिंदे यांनी मला गालावर, पाठीवर गुद्दे आणि चापट्या मारल्या. माझ्या कमरेवर आणि पायावर लाथा मारल्या, असेही या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=NM9W4BEXUQM
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.