दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाचा काटा काढला; आईनेच 11 महिन्यांच्या चिमुरड्याला ओट्य

गुन्हे बातम्या ठेवा: पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी तिने चिमुरड्याचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. मात्र, रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत या क्रूर घटनेचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भांबर्डे येथील रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी आपला 11 महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना सुरुवातीपासूनच मुलाची आई, पूजा रवींद्र पवार हिच्या वागण्यावर संशय येत होता.

Pune Crime News: पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल

पोलिसांनी जेव्हा पूजा पवारची कसून चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. “मला दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही,” या विकृत विचारातून तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याचे कबूल केले.

Pune Crime News: पुरावा नष्ट करण्याचा थरारक प्रयत्न

आरोपी महिलेने मुलाला सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह एका कापडाच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने त्यात जड दगडही भरले आणि ती बॅग गावातील एका विहिरीत फेकून दिली. पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

Pune Crime News: आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात

रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिला पूजा पवार हिला अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मातेने दुसऱ्या लग्नासाठी आपल्या चिमुरड्याचा असा निर्घृण बळी घेतल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ऋषिकेश वैद्यची शेंडीबाबत अजब मागणी मान्य; पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला दिले आदेश,नेमकं प्रकरण काय?

Thane Crime News: ठाण्यात संतापजनक घटना, अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीसोबत कन्स्ट्रक्शन साईटवर नको ते कृत्य, नराधमाला बेड्या

आणखी वाचा

Comments are closed.